Type Here to Get Search Results !

गिरगाव चौपाटी दर्शक गॅलरीवरून भाजप आक्रमक

मुंबई : गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेतर्फे उभारलेल्या दर्शक गॅलरीवरून भाजप आक्रमक झाला आहे. यासाठी आवश्यक सीआरझेडची परवानगी घेतली नसल्याचे आरोप आ. नितेश राणे यांनी केले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
गिरगाव चौपाटी येथील कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. या पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे. या गॅलरीचे काम पूर्ण होत आले असून भाजपने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आ. नितेश राणे यांनी याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवले आहे. या गॅलरीच्या बांधकामासाठी सीआरझेडची परवानगी घेतलेली नाही. समुद्रात उभारलेल्या खांबांमुळे जैवविविधतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. सर्व आरोप पालिका अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत.
प्रशासनाचे स्पष्टीकरण
ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. यात महाराष्ट्र राज्य सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए ) तसेच राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण, शिवाय पुरातत्वीय समिती, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली विशेष समिती यांच्याही परवानग्या ही दर्शक गॅलरी उभारण्यासाठी घेतल्या आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/c1qgAHu
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.