मुंबई : मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी तसेच जगभरातील मराठी माणसांना जोडण्याचे काम करण्यासाठी सुमारे १२६ कोटी रुपये खर्चून चर्नी रोड येथे सात मजली भव्य मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असून उद्या नववर्षांच्या शुभदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.
जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळय़ाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषा भवन रंगभवन येथे उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र रंगभवनला वारसा वास्तूचा (हेरिटेज) दर्जा असल्यामुळे मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र आता जवाहर बालभवनजवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्यात येणार असून त्याचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे.
सुमारे २१०० चौ.मी. क्षेत्रावर हे सात मजली भाषा भवन उभारण्यात येत असून वास्तुविशारद मे. पी.के. दास अॅन्ड असोसिएट्स यांनी भवनाची रचना केली आहे. संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल. तसेच बहुउद्देशीय सभागृह, अॅम्फी थिएटर, प्रदर्शनासाठी जागा असेल. मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा प्रवास इथे बघता येणार आहे.
April 02, 2022 at 12:11AM

via IFTTT