Type Here to Get Search Results !

ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल सेवा बंद

 मुंबई: ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला  असून सोमवारपासून (३ जानेवारी) त्याची अंमलबजावणी केली जाईल. या मार्गावर वातानुकूलित लोकलच्या १६ फेऱ्यांऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतील. ट्रान्स हार्बरवरील या १६ वातानुकूलित लोकल फेऱ्या हार्बरवर वळत्या केल्या जाणार असून यामध्ये सीएसएमटी ते गोरेगाव ते सीएसएमटी वातानुकूलित लोकल फेऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या, सीएसएमटी ते पनवेल हार्बरवर १२ फेऱ्या आणि ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बरवर १६ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. यातील जानेवारी २०२० पासून सुरू  झालेल्या ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. एका वातानुकूलित लोकल गाडीची एकूण प्रवासी क्षमता ५ हजार ९६४ आहे. यात १ हजार २८ प्रवासी आसनक्षमता व ४ हजार ९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. नोव्हेंबर २०२१ मध्ये एकूण १ हजार १९७ प्रवाशांनी ट्रान्स हार्बवरील वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला. दररोज ४० प्रवाशांनीच  १६ फेऱ्यांमधून प्रवास केला तर डिसेंबरमध्ये एकूण १ हजार ५२ प्रवाशांनी प्रवास केला होता. डिसेंबरमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ५३ होती. अल्प प्रतिसादामुळे अखेर ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हार्बरवर आणखी १६ वातानुकूलित  फेऱ्या 

ट्रान्स हार्बरवरील १६ वातानुकूलित लोकल फेऱ्या ३ जानेवारीपासून सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. सध्या हार्बरवर वातानुकूलित लोकल धावत असून त्याच्या १२ फेऱ्या होतात. त्यामुळे  या मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या २८ होणार आहे. आणखी होणाऱ्या १६ फेऱ्यांमध्ये प्रथमच सीएसएमटी ते गोरेगाव ते सीएसएमटी अशी वातानुकूलित लोकलही धावणार असून त्याच्या चार फेऱ्या होतील. सीएसएमटी ते वांद्रे ते सीएसएमटी वातानुकूलितच्या चार फेऱ्या, सीएसएमटी ते पनवेल ते सीएसएमटीच्या चार आणि सीएसएमटी ते वाशी ते सीएसएमटी वातानुकूलित लोकलच्या चार फेऱ्या होणार आहेत.

The post ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल सेवा बंद appeared first on Loksatta.

January 02, 2022 at 12:05AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.