पुढील दोन महिन्यांत नवीन कलाकृती
मुंबई : गेल्यावर्षीच्या तुलनेने यंदा नाटय़सृष्टीतील वातावरण आशादायी आहे. नव्या वर्षांत रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी काही नाटय़कृती डिसेंबर महिन्यात प्रेक्षकभेटीस आल्या तर काही नाटय़कृती जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत रंगभूमीवर येतील. यामध्ये विनोदी नाटकांची संख्या सर्वाधिक आहे. व्यावसायिक रंगभूमीवर दिवाळीनंतर नव्या नाटकांना सुरुवात होते. नववर्षांपासून पुढे पावसाळा सुरू होईपर्यंतचा हंगाम नाटकासाठी महत्त्वाचा असल्याने डिसेंबर आणि जानेवारीत आवर्जून नव्या नाटय़कृती रंगभूमीवर आणल्या जातात. गेल्यावर्षी या हंगामात नुकताच नाटकाचा पडदा उघडल्याने नवे विषय फारसे येऊ शकले नाहीत. परंतु, यंदा मात्र नवे वर्ष नाटय़मय होईल असे चित्र आहे.
डिसेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे, नम्रता संभराव ‘कुर्रररर’ या विनोदी नाटकाने दमदार हजेरी लावली. तर त्या पाठोपाठ ‘मी स्वरा आणि ते दोघं’ आणि ‘वन्स मोअर तात्या’ या कलाकृती रंगभूमीवर आल्या. लेखक दिग्दर्शक संतोष पवार यांच्या ‘हौस माझी पुरवा’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या दोन विनोदी नाटकांनीही रसिकांचे लक्ष वेधले आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. याही नाटकाचा बाज विनोदी असल्याचे सांगितले जात आहे. निर्मिती सावंत आणि वैभव मांगले ही विनोदवीरांची जोडी या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येणार आहे. फेब्रुवारी अखेरीस अरिवद जगताप लिखित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘चार्ली’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर याच दरम्यान अभिनेते निर्माते प्रशांत दामले यांचेही नवे नाटक रंगभूमीवर येणार असल्याची चर्चा आहे. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिल्यास नव्या नाटकांच्या संख्येत वाढ होईल असा अंदाज निर्मात्यांनी वर्तवला आहे.
The post नाटकांसाठी नवेवर्ष आशादायी appeared first on Loksatta.
January 01, 2022 at 12:02AM

via IFTTT