महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांना नववर्षाची भेट
मुंबई:मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना नववर्षाची भेट देत शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या आश्वासनाची शनिवारी पूर्तता केली. या निर्णयामुळे १६ लाख घरांमधील लाखो कुटुंबीयांचा मालमत्ता कर पूर्णपणे माफ होईल.
चारच दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले.
कराचा बोजा कायम
पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबईकरांची मालमत्ता करातून सुटका करण्याचे वचन शिवसेनेने दिले होते. त्यानुसार महापालिकेने मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती; पण संपूर्ण मालमत्ता कर माफ झाला नव्हता. मालमत्ता करात विविध प्रकारचे ११ कर वसूल केले जातात. यापैकी फक्त सर्वसाधारण कर माफ करण्यात आला होता. परिणामी नागरिकांवर बाकीच्या करांचा बोजा होता. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने संपूर्ण कर माफ केला आहे. याचाच अर्थ ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ताधारकांना आता यापुढे मालमत्ता कर भरावा लागणार नाही. त्यातून महानगरपालिकेला ४६५ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरचित्र संवादाच्या माध्यमातून आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर सुमारे महिनभरानंतर लोकांसमोर आलेल्या ठाकरे यांनी प्रारंभीच जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सन २०१७ ला निवडणुकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जे जमणार नाही अशी खोटी वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मालमत्ता कर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या वेळी नाव न घेता भाजपवर टीकास्त्र सोडताना, मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची, आकाशात उड्डाणपूल बांधण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत, मुंबईकरांवरील संकटकाळात ते कुठे आहेत हे शोधावे लागते असा टोला लगावला.
सन २०१७च्या निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले, देर आए दुरुस्त आहे असा चिमटा काढीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ठाणे शहरातही ५०० चौरस फुटांपर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव ठाणे महानगरपालिकेने सरकारकडे पाठविला आहे. सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
The post १६ लाख घरांचा मालमत्ता कर माफ; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांना नववर्षाची भेट appeared first on Loksatta.
January 02, 2022 at 12:06AM

via IFTTT