तातडीने उपचार केल्यास धोका कमी; डॉ. अन्वय मुळे यांचा सल्ला
मुंबई : शरीराला कोणताही त्रास होत आहे हे बहुतांश रुग्ण मान्य करत नाहीत. विशेषत: स्त्रिया हृदयाशी संबंधित आजार महिला बराच काळ अंगावर काढतात आणि आजाराची तीव्रता वाढल्यावरच उपचारासाठी येत असल्याचे दिसून येते. शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखून वेळेत उपचारासाठी आल्यास धोका नक्कीच टाळता येईल, असा मोलाचा सल्ला विख्यात हृदयशल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी ‘लोकसत्ता आरोग्यमान भवमध्ये दिला.
जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने बुधवारी आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता आरोग्यमान भव या वेबसंवादात ‘ठणठणीत हृदयासाठी’ या विषयावर डॉ. मुळे यांनी मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रतिनिधी भक्ती बिसुरे यांनी सूत्रसंचालन केले.
आहार, व्यायाम या सर्व बाबींचे पालन, कोणतेही व्यसन नाही किंवा कधी आजारी पडलो नाही, तरीही मला हृदयरोग कसा झाला असा प्रश्न अनेक रुग्णांना पडतो. हृदयरोगाचे मूळ दोन प्रकारांमध्ये आहे. एक म्हणजे आपल्या आई किंवा वडील अथवा जवळच्या नातेवाईकांना हा आजार झाला असल्यास तो होण्याची शक्यता अधिक असते. दुसरे म्हणजे स्वभाव, सवयी आणि जीवनशैली. यातील पहिली बाब आपल्याला बदलणे शक्य नाही. परंतु ज्या व्यक्तींना असा धोका आहे, त्यांनी आहार-विहाराच्या सवयींमध्ये बदल केल्यास आजार थोपविता येऊ शकतो. अन्यथा हा आजार आधीच्या पिढीमध्ये आनुवंशिकरीत्या साठीत होत होता, तोच आजार आता पुढील पिढीला तिशी किंवा चाळीशीनंतर होण्याची दाट शक्यता आहे, असे डॉ. मुळे यांनी सांगितले.
मानसिकदृष्टय़ा आनंदी असणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. ताण वाढल्यास शरीरात अॅड्रनिलचे उत्सर्जन वाढते. तसेच रक्तदाब कमी अधिक होण्याचे प्रमाण वाढते. याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. मन जितके आनंदी तितके हृदय सदृढ. आपला मृत्यू हृदय निकामी झाल्यामुळे होऊ नये. आपले हृदय इतके सदृढ असावे की मृत्यूनंतरही दुसऱ्या शरीरातही त्याच्या रुपात आपल्याला जगता यावे अशी आकांक्षा मनाशी बाळगून आपण हृदयाचे आरोग्य जपायला हवे, असे आवाहन डॉ. मुळे यांनी केले.
दररोज किमान अर्धा तास व्यायाम.
आईच्या गर्भात असल्यापासून अखंड कार्यरत असलेल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी दिवसभरात किमान अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे. दैनंदिन आयुष्यात अर्धा तास तुम्ही तुमच्या शरीरासाठी काढू शकलात तर त्याचे भविष्यात नक्कीच फायदे दिसतात.
हृदयविकाराचा झटका आल्यास.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छातीत खूप तीव्र कळ येते. यावेळी रक्तवाहिनीमधील रक्तप्रवाह बंद होत असल्यामुळे तेथील स्नायू मृत होत असतात. त्यामुळे हे दुखणे कोणत्याही दुखणे कमी करणाऱ्या गोळीने थांबविता येत नाही. अशावेळी दवाखान्यात नेईपर्यत रुग्णाला सॉर्बिट्रेट किंवा अॅस्पिरिन ही गोळी द्यावी.
तुम्हीच व्हा तुमचे डॉक्टर.. दैनंदिन आयुष्यात सवयीच्या कृती करताना थकवा जाणवत असेल किंवा काही दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर किंवा हृदय तुमच्याशी बोलत असते. त्याचा आवाज ऐका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हृदयरोग प्रतिबंधासाठी कोणत्याही चाचण्यांपेक्षा शरीराने दिलेले संकेत ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हीच तुमचे डॉक्टर व्हा, असा सल्ला डॉ. मुळे यांनी दिला आहे.
The post हृदयाबाबत शरीराचे संकेत वेळीच ओळखा! appeared first on Loksatta.
September 30, 2021 at 03:13AM

via IFTTT