मुंबई : राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या निधीचा वापर नीट झाला नाही व कामचुकारपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील खड्डय़ांबाबतच्या बैठकीत दिला. तसेच पाऊस अधिक असलेल्या भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी भर दिला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अनेक मंत्र्यांनी राज्याच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे लोकांना होत असलेल्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त के ली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी या विषयावर बैठक बोलावली होती.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डय़ांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.
रस्ते दुरुस्तीच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञानाचा कटाक्षाने वापर करावा तसेच अधिक पावसाच्या भागांत डांबरीकरणाएवजी काँक्रीटमधले रस्ते बांधण्यावर भर द्यावा.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
The post खड्डय़ांबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक : रस्तेदुरुस्तीत कामचुकार अधिकारी-कंत्राटदारांची यापुढे गय नाही! appeared first on Loksatta.
September 30, 2021 at 03:08AM

via IFTTT