Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत

मराठवाडय़ातील नुकसानीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत के ली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.

मराठवाडय़ात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवावी असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचावकार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाडय़ातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.

सध्या बचाव व तातडीच्या मदतकार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहे, शेतपिके वाहून गेली आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचवा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

उस्मानाबादला मोठा फटका

उस्मानाबाद जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके प्रभावित झाले असून एकूण दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याने शिराढोण १७१ मिमी, गोविंदपूर १०७ मिमी, ढोकी जाकची आणि तेर येथे जवळपास १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ामध्ये दोन मोठय़ा नद्या असून मांजरा नदीवरील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून साधारणत: ७०६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या खालील वाकी व वाक्केवाडी गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती व गावातील नागरिक अडकले होते. या नागरिकांना स्थानिक बचाव पथकांच्या माध्यमातून बोटीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्य़ातील दाऊतपूर गावातील सहा व्यक्ती तेरणा नदीच्या पाण्यामुळे वेढले गेल्याने ते उंच भागात टेकडीवर आसरा घेऊन थांबले आहेत. यांच्या बचावासाठी भारतीय हवाई हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. तालुका सौंदनाआंबा गाव कळंब येथे दहा जणांना व उस्मानाबाद गाव दाऊतपूर येथे सहा जणांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्य़ातील निर्माण पूरपरिस्थितीमध्ये स्थानिक बचाव पथकाने आतापर्यंत २४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.

जळगाव जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील सर्व धरणे १०० टक्के क्षमतेने भरलेली आहेत. चाळीसगाव येथे यापूर्वी ढगफुटी झाली होती. त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे चाळीसगावमध्ये पाणी साचलेले आहे. सध्या रेड-अ‍ॅलर्ट असल्याने सर्व तालुक्यांत स्थानिक बचाव दल तैनात करण्यात आले असून, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम अंमळनेर येथे तैनात करण्यात येणार आहे.

१०० जणांना वाचवले

एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ भागांतील सुमारे १०० जणांना वाचविले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टरने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये तीन जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतमाळ आणि औरंगाबादमधून अनुक्रमे दोन आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले असे मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक उस्मानाबाद आणि लातूरमध्ये असून हवाईदलाचे हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्य़ांत बचावकार्य करीत  होते.

पोकळ आश्वासने नकोत,प्रत्यक्ष मदत करा!

मुंबई : राज्यात विशेषत: मराठवाडय़ात पावसाने प्रचंड नुकसान झाले असल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणि लहान समाजघटकांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. त्यांना पोकळ शब्द आणि आश्वासनांची नाही, तर आर्थिक मदतीची अधिक गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.  दरम्यान,  नाशिक जिल्ह्य़ातील अंबड येथे ब्युटी पार्लरमध्ये शिरून बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा, यासाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम नाशिक पोलिसांनी केला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे सोडून पीडितेसाठी न्याय मागणाऱ्यांवर अनेक कलमांखाली गुन्हे आणि तीही इतकी कलमे दाखल केल्याने नाशिकमध्ये मोगलाई आली आहे का, असा सवाल फडणवीस यांनी केला.

The post शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत appeared first on Loksatta.

September 30, 2021 at 03:14AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.