मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दूरध्वनी करून चर्चा केली. त्यामुळे खडसे भाजपमध्ये परतण्याची चर्चा सुरू असली तरी खडसे यांनी त्याचा ठामपणे इन्कार केला आहे. खडसे यांनी नवी दिल्लीला जाऊन सून खासदार रक्षा खडसे यांच्याबरोबर शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट न झाल्याने त्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावरून खडसे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा >>> ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंकडे; फडणवीस यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी
पण शहा हे केंद्रीय गृहमंत्री असून मी वैयक्तिक कारणांसाठी त्यांना दूरध्वनी केला. त्यांच्याशी माझे पूर्वीपासून संबंध असून त्यात काहीच गैर नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ते माहीत आहे, मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/Hm7TC6p
via IFTTT