Type Here to Get Search Results !

एसी लोकलमधून ११ हजार फुकटय़ांवर कारवाई; गेल्या पाच महिन्यांतील आकडेवारी

मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी आणि तिकीट दरात करण्यात आलेली ५० टक्के कपात यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद वाढत आहे. मात्र, त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन या लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. रेल्वे प्रशासनही याबाबत दक्ष झाले असून विनातिकीट प्रवाशांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेने ११ हजार ७११ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे.

 वातानुकूलित लोकलच्या पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – विरार दरम्यान दररोज ३२, तर मध्य रेल्वेवर ५६ फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या. ५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीला काहीसा प्रतिसाद वाढू लागला. प्रतिसाद वाढत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही प्रवाशांकडे वातानुकूलित लोकलचे तिकीट उपलब्ध नसते, तर काही प्रवासी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून बिनदिक्कतपणे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत असल्याचे आढळले आहे. वातानुकूलित लोकलमध्ये सध्या तिकीट तपासनीस नाहीत. याचाच गैरफायदा काही प्रवासी घेतात आणि बिनदिक्कतपणे प्रवास करतात. तिकीट दरात कपात करण्यापूर्वीही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत होते. मात्र आता त्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

पश्चिम रेल्वेवर जानेवारी ते मे २०२२ या काळात एकूण आठ हजार ३६९ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. यापैकी जानेवारी २०२२ मध्ये ७२७ विनातिकीट प्रवासी, तर मे महिन्यात दोन हजार ४०० विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. पाच महिन्यांत २९ लाख ४२ हजार ५९९ रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेवरही पाच महिन्यांत तीन हजार ३४२ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४७३ प्रवाशांना जानेवारीत, एक हजार ८२१ जणांना एप्रिलमध्ये, तर ६८० जणांना मेमध्ये पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पश्चिम रेल्वे विनातिकीट प्रवासी

महिना                विनातिकीट

जानेवारी            ७२७

फेब्रुवारी               १,८३०

मार्च             १,६५८

एप्रिल             १,७५४

मे                २,४००

एकूण             ८, ३६९

मध्य रेल्वे विनातिकीट प्रवासी

महिना     विनातिकीट

जानेवारी    ४७३

फेब्रुवारी २४४

मार्च       १२४

एप्रिल   १,८२१

मे  ६८०

एकूण   ३,३४२

June 03, 2022 at 12:02AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.