मुंबई : शहरात करोना रुग्णसंख्येत चढ -उतार पाहावयास मिळत असून रविवारी मुंबईत ३७५ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ६४ हजार ९७८ वर पोहोचली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे रविवारी शून्य मृत्यूची नोंद झाली. मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९ हजार ५६६ आहे. तर दिवसभरात २३४ रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ४३ हजार ३४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत सध्या २,०७० सक्रिय रुग्ण आहेत. शहरात रविवारी सात हजार ५८१ चाचण्या करण्यात आल्या. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/jZGId5C
via IFTTT