मुंबई : कमी खर्चात बनवलेल्या भारतीय चित्रपटांतून चांगला संदेश देशवासियांपर्यंत पोहोचतो. त्या चित्रपटांतून देशाला एक करण्याचे काम केले जाते, असे मत केंद्रीय उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी रविवारी व्यक्त केले.
देशात अॅनिमेशनपटांची निर्मितीही मोठय़ा प्रमाणावर व्हावी, कारण त्याद्वारे नव्या पिढीला संदेश देणे सहज शक्य होते, अशी अपेक्षाही गोयल यांनी व्यक्त केली.
कमी खर्चाच्या चित्रपटांनाही प्रेक्षक गर्दी करतात. कारण त्यांना गुणवत्ता भावते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाने काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचे वास्तव चित्रण दाखवले. या चित्रपटाने चांगली कमाई केलीच, परंतु असा प्रकार पुन्हा होऊ नये, असा संदेशही दिला, असेही गोयल म्हणाले.
वरळीच्या नेहरू केंद्रात माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांच्या ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
माहितीपटांचा प्रभाव मोठा असून समाजात बदल घडवून आणण्यासह प्रेरणा देण्याचे काम त्यातून होत असते, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी या महोत्सवात दूरचित्रमाध्याम संदेशाद्वारे मांडले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आदी यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
संजीत नार्वेकरांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव
ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना यंदाचा ‘डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सिनेसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान, विशेषत: चित्रपटांचा इतिहास आणि माहितीपट निर्मिती चळवळीविषयी त्यांनी केलेल्या रंजक लिखाणाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
May 30, 2022 at 01:32AM

via IFTTT