Type Here to Get Search Results !

करोनाकाळातही लाखो वृद्धांवर सरकारी रुग्णालयांत उपचार

संदीप आचार्य

मुंबई : देशात व राज्यात वृद्ध लोकांची संख्या वेगाने वाढत असून महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून वृद्धांच्या आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात उपचार करण्यात येत आहेत. करोनाकाळात मागील दोन वर्षांत सुमारे तीन लाखांहून जास्त वयोवृद्ध रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले, तर दीड लाखांहून अधिक रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले. महत्त्वाचा भाग म्हणजे यातील असंसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

केंद्राच्या योजनेनुसार राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम राज्यातील ३४ जिल्ह्यांत राबविण्यात येतो. २०१८-१९च्या सर्वेक्षणानुसार राज्यात शहरी भागात ६० पुढील नागरिकांची संख्या १०.१ टक्के, तर ग्रामीण भागात १३.४ टक्के वाढल्याचे दिसून येते. आवश्यकतेनुसार आरोग्य विभागाने जिरिअ‍ॅट्रिक विभागांची स्थापना करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात यासाठी दहा खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून प्रामुख्याने ग्रामीण भागात फिजिओथेरपी तसेच अस्थिव्यंगाच्या समस्या असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे आरोग्य संचासक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या रुग्णांची संख्या खूप मोठी असून आगामी वर्षांत आम्ही एक लाख शस्त्रक्रिया करण्याचा निर्धार केल्याचे डॉ. तायडे म्हणाल्या. प्रामुख्याने ग्रामीण भागात वृद्धांच्या समस्या शोधण्यासाठी थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सुरुवात करण्यात येत असून आवश्यकतेनुसार या रुग्णांना ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येत.

प्रामुख्याने राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यात वृद्धांमधील मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणीसाठी प्राथिमक आरोग्य केंद्र स्तरावर विविध आरोग्य मेळावे घेण्यात येतात. चंद्रपूर जिल्ह्यात टाटा ट्रस्टच्या मदतीने फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले असून नंदुरबार येथे मानसिक आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत तीन कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर दीड कोटी लोकांना दाखल करून उपचार करण्यात आले आहेत.

May 03, 2022 at 12:00AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.