मुंबई : संगीताशी घट्ट नाते जोडलेल्या मंगेशकर कुटुंबातील सदस्य प्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना लाभलेला स्वरांचा अलौकिक वारसा सगळय़ांना ज्ञात आहे. त्यांच्या गाण्याबरोबरच त्यांच्यात दडलेल्या चित्रकाराचे दर्शन घडवणाऱ्या ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते मंगळवारी पेडर रोडवरील प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
उषा मंगेशकर उत्तम चित्रकार आहेत हे जगाला ज्ञात व्हावे, अशी इच्छा खुद्द लतादीदी बाळगून होत्या, आज त्यांची ही इच्छा पूर्ण झाली, ही आठवणही यावेळी मंगेशकर कुटुंबीयांना आनंद आणि समाधान देऊन गेली. उषा मंगेशकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचे संकलन ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’ या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या पुस्तकाचे एकूण १२९ चित्रांचे संकलन आहे. या पुस्तकाची निर्मिती अनुजा रिदम वाघोलीकर यांनी केली असून डिझाईन नूतन आसगावकर यांचे आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांच्या तीन पिढय़ा या प्रकाशन सोहळय़ाला आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या.
‘या पुस्तकाच्या माध्यमातून मी चित्रकार या रूपात सर्वाना भेटते आहे. चित्रकला ही माझ्या हृदयाच्या अत्यंत जिव्हाळय़ाची गोष्ट. कोणत्याही कलाप्रकारात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्या कलेचा सखोल अभ्यास आणि त्या कलेतील प्रावीण्य आवश्यक असते. या पुस्तकातील चित्रे ही या कलाप्रकाराबद्दल माझी जी समज आहे, त्याचा शिखरिबदू आहे. ही चित्रे म्हणजे परिपूर्ण कला नाही, कारण कोणत्याही कलेला कधीही पूर्णविराम लावता येत नाही’, अशी भावना उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.
लतिका क्रिएशन्सतर्फे ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. आदिनाथ मंगेशकर, योगेश खडीकर आणि अन्य मंगेशकर कुटुंबीयांबरोबरच लेखक रिदम वाघोलीकर, रचना शहा, डॉ. निशित शहा, सुधीर आणि अनुराधा वाघोलीकर, आशय वाघोलीकर, प्रशांत आणि सविता दंडवते तसेच डॉ. किरण गुप्ता आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘उषा मंगेशकर नेहमी आपली चित्रे जगासमोर आणण्यास संकोच करत असत. आज या पुस्तकाची निर्मिती आणि प्रकाशन हे एकप्रकारे उषा मंगेशकर यांची चित्रे जगासमोर आणण्याच्या लता दीदींच्या इच्छेचे साकार रूप आहे’, अशी भावना लतिका क्रिएशन्सचे मयुरेश पै यांनी व्यक्त केली.
May 04, 2022

via IFTTT