मुंबई : राज्यातील करोना साथरोगाचा प्रादुर्भाव ओसरल्याने यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्बंधमुक्त जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली. अर्थात आरोग्याची काळजी घेऊनच जयंती उत्साहात साजरी करु या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
देशात व राज्यात २०२० मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच करोना साथरोगाचा शिरकाव झाला. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढू लागल्याने देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्यावेळी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी लागली. दुसऱ्या वर्षी २०२१ मध्ये मार्चमध्येच करोनाची दुसरी लाट सुरु झाली. त्या वेळीही आंबेडकर जयंती साजरी करण्यास निर्बंध घालण्यात आले. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने प्रभात फेऱ्या, मिरवणुका, व्याख्याने, जाहीर सभा, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु गेली दोन वर्षे करोनामुळे अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती.
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंबेडकर जयंती पूर्वीप्रमाणेच उत्साहात साजरी करण्यास मान्यता देण्यात आली. या संदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, गेली दोन वर्षे डॉ बाबासाहेबांची जयंती उत्सव व महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन, अशा दोन्ही कार्यक्रमात आपण करोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वाना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आहेत.
March 30, 2022 at 01:20AM

via IFTTT