Type Here to Get Search Results !

किमान समान कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी; नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यातील आघाडी सरकारने आता किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी विनंती करणारे पत्र  प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. मागील दोन वर्षांत करोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे. 

 जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वागीण विकास साधण्याच्या हेतूने २०१९ मध्ये तीन पक्ष एकत्र आले. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालेल असे ठरलेले आहे. सोनिया  गांधी यांनी दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठीच्या योजनांवर सरकारने काम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना याआधीही पत्र पाठवले होते. करोनामुळे राज्य सरकारपुढे अडचणी होत्या. आता सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली आहे. त्यामुळे  दलित, ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांची तसेच किमान समान कार्यक्रमांची अंमलबाजवाणी करावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/EPX6ae4
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.