मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कोणत्याही आरोपावर ठोस उत्तर दिलेले नाही. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोविड काळात २४ महिन्यांत अनेक मालमत्ता खरेदी केल्या यावर ते काहीही बोलले नाहीत. तुमच्या घर-गाडय़ांवर कारवाई होत आहे म्हणून ईडीचा त्रास होतो. मुळात तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही व तुम्ही म्हणजे मराठी नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील चर्चेला मुद्देसूद उत्तर द्यायला हवे होते. पण त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत केले. प्राणवायू खरेदीतील भ्रष्टाचार, यशवंत जाधव यांनी गोळा केलेली बेहिशेबी संपत्ती, २१ कोटी रुपयांची टॅब खरेदी अशा विविध विषयांवर त्यांनी उत्तर दिलेले नाही. दहिसरमधील भूखंडाचे मूल्य यंत्रणेने ठरवले असले तरी त्यावर पूर्णपणे झोपडपट्टी आहे हे कसे विसरायचे, असा सवाल फडणवीस यांनी केला. युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मदत मागावी कारण त्यांच्याजवळ टोमणेबॉम्ब आहे. ठाकरे यांचे भाषण म्हणजे अरण्यरुदन होते असा चिमटा फडणवीस यांनी काढला. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या हसिना पारकर यांच्यासोबतच्या जमीन खरेदीचे काय, असा सवाल करत मलिकांचे समर्थन ठाकरे यांना करावे लागते याचे वाईट वाटते, असेही म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मते मागितली आणि सत्तेसाठी शकुनीमामाच्या मागे गेले. कपटाने सत्ता मिळवली, अशी टीकाही फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर केली.
विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर विनोद तावडे म्हणाले की, मुस्लिम समाजातून दोन जागा मुत्तवली विभागातून निवडून येतात. डॉ. लांबे हे या विभागातून निवडून आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विभागाला सादर केली व मंत्री म्हणून मी सही केली.
March 26, 2022 at 12:19AM

via IFTTT