मुंबई : मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शिवडी येथील महानगरदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी समन्स बजावत २ मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले. ममता यांनी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान त्यांची अधिकृत कर्तव्ये पार पाडलेली नाहीत. त्यामुळे त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्यावर कारवाईसाठी मंजुरीची आवश्यकता नाही किंवा कारवाई करण्यासाठी कोणताही अडथळा नसल्याचेही महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कफ परेड पोलिसांना देण्याची मागणी भाजपचे मुंबई विभागाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केली होती.
The post ममतांना २ मार्चला हजर राहण्याचे आदेश appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/Syg59rBsR
via IFTTT