ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे काम
मुंबई : ठाणे ते दिवा जलद पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या कामाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ ते ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ असा ७२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. रुळांच्या कामांसह अनेक तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर ८ फेब्रुवारीपासून जलद सहावी मार्गिका सेवेत येईल. या ब्लॉकच्या कालावधीत अप व डाऊनवरील ११७ एक्स्प्रेस आणि ३५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस, तसेच लोकल गाड्या ४ फेब्रुवारीपासून रात्री ११.१० ते ६ फेब्रुवारीपर्यंत पहाटे ४ वाजेपर्यंत कल्याण ते मुलुंडदरम्यान अप धिम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. ठाणे स्थानकात या गाड्यांना थांबा नसेल. तर ६ फेब्रुवारीपासून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल नवीन अप जलद मार्गावरून कळवा फलाट क्रमांक चार आणि नवीन बोगद्यातून धावतील.
कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस ४ फेब्रुवारीपासून रात्री ११.१० वाजल्यापासून ते ब्लॉक संपेपर्यंत मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
वसई रोड ते पनवेल, रोहा मेमू फक्त विशेष गाड्या चालवल्या जातील. नियमित वेळापत्रक या वेळी रद्द असेल.
पश्चिम रेल्वेने ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान डहाणू रोड ते पनवेल, पनवेल ते वसई रोड, पनवेल ते वसई रोड ते पनवेल यासह रोहा ते पनवेल ते रोहा, पेण ते पनवेल ते पणे विशेष मेमू गाड्या चालवण्यात येणार आहेत.
मेगा ब्लॉक काळात गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी ते दादर तुतारी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव ते मुंबई मांडवी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०११२ मडगाव ते मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२६२० मंगलुरु जक्शन ते एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस पनवेल स्थानकापर्यंत चालवली जाणार आहे. तर गाडी क्रमांक ११००३ दादर ते सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०१०३ मुंबई ते मडगाव मांडवी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०१११ मुंबई ते मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस यासह काही गाड्या पनवेल स्थानकातून सुटतील. तर डोंबिवली ते बोईसर ते वसई रोड, वसई ते दिवा ते वसई रोड, दिवा ते रोहा ते दिवा, दिवा ते पनवेल ते दिवा या मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या सेवांवर परिणाम…
’ ५ व ६ फेब्रुवारी गाडी क्रमांक २२११९ व २२१२० मुंबई ते करमाळी ते मुंबई एक्स्प्रेस, ५ ते ७ फेब्रुवारी गाडी क्रमांक १२०५१ व १२०५२ मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, ७ व ८ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११०८५ व ११०८६ एलटीटी ते मडगाव एक्स्प्रेस ते एलटीटी एक्स्प्रेस, ५ व ६ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११०९९ व १११०० एलटीटी ते मडगाव ते एलटीटी
’ ५ व ७ फेब्रुवारी गाडी क्रमांक २२११३ व २२११४ एलटीटी ते कोच्चुवेली ते एलटीटी एक्स्प्रेस, २ फेब्रुवारी व ६ फेब्रुवारी गाडी क्रमांक १२२२४ एर्नाकुलम ते एलटीटी टर्मिनस एक्स्प्रेस, ५ फेब्रुवारी व ८ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११२२२ एलटीटी ते एर्नाकुलम एक्स्प्रेस
’ ७ व ८ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११००३ व ११००४ दादर ते सावंतवाडी ते दादर तुतारी एक्स्प्रेस, ५ ते ७ फेब्रुवारी गाडी क्रमांक ५०१०३ व ५०१०४ दिवा ते रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर, ४ ते ८ फेब्रुवारी गाडी क्रमांक १०१०५ आणि १०१०६ दिवा ते सावंतवाडी ते दिवा एक्स्प्रेस, ४ ते ७ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११००८ पुणे ते मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
५ ते ८ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११००७ मुंबई ते पुणे डेक्कन एक्स्प्रेस, ५ ते ७ फेब्रुवारी गाडी क्रमांक १२१२३ व १२१२४ मुंबई ते पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, ५ व ६ फेब्रुवारी गाडी क्रमांक १२१३१ व १२१३२ दादर ते साईनगर शिर्डी ते दादर एक्स्प्रेस, ३ व ५ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११०४१ दादर ते साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, ४ व ६ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११०४२ साईनगर शिर्डी ते दादर एक्स्प्रेस, ४ व ५ फेब्रुवारी गाडी क्रमांक २२१४७ व २२१४८ दादर ते साईनगर शिर्डी ते दादर एक्स्प्रेस, ४ व ५ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११०२७ व ११०२८ दादर ते पंढरपूर ते दादर एक्स्प्रेस, ५ ते ७ फेब्रुवारी गाडी क्रमांक ११०२९ व ११०३० मुंबई ते कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्स्प्रेस
The post उद्या रात्रीपासून ७२ तासांचा मेगाब्लॉक; ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे काम appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/cAntzgdJ2
via IFTTT