मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांना घाबरवण्यासाठी राजकीय सुडापोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक के ल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला. देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कसे पळाले, याचे कें द्र सरकारने व भाजपने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी के ली.
ईडीने देशमुख यांच्यावर के लेल्या अटके च्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मलिक म्हणाले की, पुढचा नंबर परिवहनमंत्री अनिल परब यांचा आहे, असे भाजपच्या नेत्यांनी सोमवारी ट्वीट केले होते. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे.
The post ‘महाविकास आघाडीतील नेत्यांना घाबरवण्यासाठी देशमुखांना अटक’ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2Y8gvSI
via IFTTT