मुंबई : मंत्रालयात विविध कामांनिमित्त येणाऱ्या व्यक्ती, वाहने आणि सामानाची विशिष्ट पद्धतीने तपासणी करून प्रवेश देण्यासाठी ‘प्रमाणित संचालन पद्धती’ (एसओपी) अवलंबण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या परिसरात मद्याच्या बाटल्या सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कुणाला कसा प्रवेश द्यायचा, व्यक्तींची, वाहनांची आणि सामानाची तपासणी कशी करायची, या संदर्भात नव्याने प्रमाणित संचालन पद्धती (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू आहे.
सर्वसामान्य परिस्थितीत मंत्रालयात दुपारी २ नंतर प्रवेश दिला जात असे. कुणाला कुठल्या प्रवेशद्वाराने, कसा प्रवेश द्यायचा, याची कार्यपद्धती निश्चित आहे; परंतु करोनामुळे या प्रवेशावर निर्बंध आले आहेत. आता के वळ मंत्री कार्यालयाच्या लेखी परवानगीनंतरच अभ्यागतांना प्रवेश दिला जातो.
दिवाळीनंतर मंत्रालय प्रवेशावरील हे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने प्रवेशासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.
The post मंत्रालय प्रवेशासाठी नवीन पद्धत appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3GLdIQL
via IFTTT