रुग्णसेवेवर परिणाम, अतिरिक्त शस्त्रक्रिया रद्द
मुंबई : राज्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईतील शासकीय महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
शुक्रवार सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयातील सुमारे पाच हजार डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. शैक्षणिक शुल्कमाफी करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग लेखी लिहून देत नाही तोपर्यत संप मागे न घेण्याचा पवित्रा मार्डने घेतला आहे. याबाबत दिवसभरात झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शुक्र वारी रात्रीपर्यंत तरी संप मागे घेण्याबाबत मार्डने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शुक्रवारीदेखील रात्री उशिरापर्यत वैद्यकीय शिक्षण विभागासोबत मार्डची बैठक सुरू होती.
सकाळपासून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात बाह्य़ रुग्ण विभाग बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना माघारी जावे लागले. रुग्णालयातील आपत्कालीन सेवा आणि शस्त्रक्रिया सुरू होत्या. परंतु अतिरिक्त शस्त्रक्रिया रद्द केल्या असल्याची माहिती लो. टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
नायर आणि केईएमध्येही केवळ आपत्कालीन शस्त्रक्रिया, प्रसूती, सिझेरियन सुरू होत्या. परंतु इतर शस्त्रक्रिया मात्र पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. काही शासकीय रुग्णालयांमध्ये प्राध्यापक आणि इतर डॉक्टरांनी शुक्रवारी बाह्य़ रुग्ण सेवा सुरू ठेवल्या होत्या, तर काही रुग्णालयांमध्ये डीएनबी, सीपीएसचे विद्यार्थी कार्यरत असल्यामुळे जास्त परिणाम झालेला नाही.
करोना, आपत्कालिन सेवा सुरळीत
करोना रुग्णांसह आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवांमध्ये निवासी डॉक्टर कार्यरत राहतील असे मार्डने जाहीर केले असल्यामुळे शुक्रवारी करोना रुग्णांसह अतिदक्षता विभागातील सेवांवर संपाचा कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु विभागातील किंवा बाह्य़ रुग्ण विभागात मात्र निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णसेवा काही प्रमाणात कोलमडली होती.
The post निवासी डॉक्टरांचा संप सुरूच appeared first on Loksatta.
October 02, 2021 at 03:13AM

via IFTTT