Type Here to Get Search Results !

आणखी एका संशयिताला ‘एटीएस’कडून अटक

दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप

मुंबई : दहशतवादी कट रचल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) ५० वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अटक केली. आरोपी वांद्रे पूर्व परिसरातील रहिवासी असून न्यायालयाने आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

   मोहम्मद इरफान रेहमत अली शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. यापूर्वी या प्रकरणात झाकीर हुसेन शेख व रिझवान इब्राहिम मोमीन या दोघांना एटीएसने अटक केली होती.

या कटात सहभागी इतर संशयितांच्या तो संपर्कात होता. शेख हा कपडे शिलाईचे काम करत असून वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात पत्नी व चार मुलांसोबत राहतो. तो झाकीर शेखचा निकटवर्तीय आहे. देशात घातपाती कारवायांच्या तयारीत असलेला पाकिस्तानातील अ‍ॅन्थोनी ऊर्फ अनस ऊर्फ अन्वर याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून झाकीर हुसेन शेख(५२) बेकादेशीर कृत्ये (प्रतिबंधक)अधिनियम, १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्वप्रथम एटीएसने अटक केली होती. याप्रकरणी झाकीरच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रिझवानला अटक केली. त्याच्या मुंब्रा येथील घरी एटीएसने घेतलेल्या झडतीत संशयित दस्तऐवज सापडले असून ते जप्त करण्यात आले होते.

या सर्वांचा म्होरक्या अ‍ॅन्थोनी ऊर्फ शाकीर शेख याने ५० हजार रुपये हवालामार्फत पाठवले. ती रक्कम अटकेतील आरोपी मोहम्मद इरफान रेहमत अली शेख याने स्वीकारले व झाकीर हुसेन शेखला दिल्याचा एटीएसला संशय आहे.

The post आणखी एका संशयिताला ‘एटीएस’कडून अटक appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3zWDNIa
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.