शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून पोलीस दलात बदल्याचे चक्र सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने राज्यभरातील १०९ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी जाहीर केली होती. शनिवारी जिल्ह्याबाहेरून बदली होऊन आलेल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची विविध ठिकाणांवर नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा- मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दोन हजार बेस्ट बस दाखल होणार
मुंबईत बदलीवर आलेल्या आणि मुंबई विभागातील कार्यकाळ संपलेल्या पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यांची विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागातील दोन्ही पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांची सायबर गुन्हे शाखा, सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना येथून हेमराज राजपूत यांची परिमंडळ ६ मध्ये बदली करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची रिक्त झालेल्या गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी वर्णी लागली असून गुन्हे शाखा १च्या पोलीस उपायुक्तपदी कृष्णकांत उपाध्याय यांची बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा- मोबाइल ॲप तिकिटाची अंतराबाबतची अट शिथिल; मध्य व पश्चिम रेल्वेचा निर्णय
परिमंडळ १ मध्ये हरी बालाजी, परिमंडळ २ मध्ये अभिनव देशमुख, परिमंडळ ३ मध्ये अकबर पठाण, परिमंडळ ४ मध्ये प्रवीण मुंढे, परिमंडळ ५ मध्ये मनोज पाटील, परिमंडळ ६ मध्ये हेमराज राजपूत, परिमंडळ ७ मध्ये पुरुषोत्तम कराड, परिमंडळ ८ मध्ये दीक्षित गेडाम, परिमंडळ ९ मध्ये अनिल पारस्कर, परिमंडळ १० मध्ये महेश्वर रेड्डी, परिमंडळ ११ मध्ये अजय बंसल, परिमंडळ १२ मध्ये स्मिता पाटील आणि परिमंडळ (बंदर) मध्ये संजय लाटकर, पोलीस मुख्यालय १ मध्ये एम. रामकुमार, पोलीस मुख्यालय २ मध्ये तेजस्वी सातपुते यांची बदली झाली आहे.
from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/8nersUK
via IFTTT