Type Here to Get Search Results !

मंत्रालयातील १५० साहाय्यक कक्षाधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाच्या अनास्थेमुळे मंत्रालयातील १५० सहायक कक्षाधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरीही विभागीय पदोन्नती समितीची बैठक झालेली नाही.

कक्षाधिकारी, अवर सचिव, उपसचिव या संवर्गातील अधिकाऱ्यांची  वर्षांतून दोन वेळा पदोन्नती  केली जाते; पण सहायक कक्षाधिकारी संवर्गाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून चालढकल केली जात आहे. यामुळे सहायक कक्षाधिकारी पदावरील अधिकारी जे पदोन्नतीस पात्र आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे.

सहायक कक्षाधिकारी यांना निवड झाल्यापासून कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ८ वर्षांत पदोन्नती मिळते. मात्र २०१२ या वर्षी निवड झालेल्या सहायक कक्षाधिकारी पासून ते पुढील तीन वर्षे निवड झालेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली आहे. त्याचबरोबर लिपिक म्हणून निवड झालेले आणि पदोन्नती होऊन सहायक कक्षाधिकारी असलेले असे सुमारे १५० जण पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत.  पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता यादी तयार केली जाते. गोपनीय अहवाल मागवले जातात. विभागीय चौकशी असेल तर त्याबाबत कागदपत्रे गोळा केली जातात.



from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/Ien1NAO
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.