Type Here to Get Search Results !

सरकार प्रत्येकाच्या मनातले – मुख्यमंत्री

मुंबई : सरकार प्रत्येकाच्या मनातलं, आपलं सरकार आहे. चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यात यशही येत आहे. सरकारला आणखी मजल गाठायची आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.शिंदे यांनी दिवाळीनिमित्त जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी मागील चार महिन्यात राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या

चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राकडे सर्व आशेने पाहात आहेत. आपल्या सर्वासाठी आम्ही हे शिवधनुष्य पेललं आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, समाजकारण आणि राजकारण यामध्ये समाजकारणाला प्राधान्य द्या. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचितांच्या विकासाचा आमचा ध्यास आहे, असे शिंदे म्हणाले.

आपण ज्येष्ठांसाठी मोफत एसटी प्रवास मोफत केला आहे. दिवाळीसाठी सामान्यांना आनंदाचा शिधा दिला. आपत्तीग्रस्तांना मदत केली. राज्यातील ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार आहे. चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरू आहे. समृद्धी महामार्गाचा शुभारंभ लवकरच आपण करणार आहोत, असेही शिंदे यांनी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी, पोलीस भरती यासाठी प्रयत्नशील असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना मदत करणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.



from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/pwvoPS4
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.