आरे दुग्ध वसाहत येथे रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याला वनविभागाने पकडले. सकाळी सहा वाजता युनिट क्रमांक १५ येथून बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात आले असून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे.
इतिका लोट हिच्या मृत्यूनंतर नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने युनिट क्रमांक १५ येथे ३० सीसीटीव्ही कॅमेरे लावून दोन संशयित बिबट्याचे निरीक्षण सुरू केले. तसेच तेथे दोन पिंजरेही लावले. बुधवारी सकाळी तीन वर्षांचा सी-५५ नर बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर वनविभागाने दुसऱ्या सी-५६ बिबट्याचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी युनिट क्रमांक १५ येथे आणखी एक बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनविभागाने दिली. हा बिबट्या सी-५६ आहे का लवकरच समजेल.
from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/z4r5oDm
via IFTTT