Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीद्वारे हजारो रुग्णांना जीवनदान

संदीप आचार्य

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’च्या माध्यमातून गरीब रुग्णांसाठी आर्थिक मदत मोठय़ा प्रमाणात दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे पूर्वी ज्या खर्चीक आजारांचा या योजनेत समावेश नव्हता त्या आजारांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांत जवळपास १२०० हून अधिक रुग्णांना या योजनेमधून पाच कोटी रुपये मदत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तात्काळ जुलै महिन्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता मदत निधी योजने’ला गती देण्याचे आदेश जारी केले. तसेच या योजनेचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली. चिवटे यांनी योजनेविषयी सांगितले की, यापूर्वी अनेक खर्चीक व गंभीर आजारांचा या योजनेत समावेश नव्हता, तो आता नव्याने करण्यात आला आहे. यात फुप्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी जो अर्ज करावा लागतो त्यात सोपेपणा आणण्यात आला आहे. शिंदे मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाख रुपयांची, तर ऑगस्टमध्ये २६३ रुग्णांना सव्वा कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये २९२ रुग्णांना एक कोटी ५६ लाख रुपये मदत करण्यात आली.

फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे २०१४ ते मार्च २०१९ या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीच्या माध्यमातून लक्षावधी रुग्णांना मदत करण्यात आली होती. यात मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीच्या माध्यमातून ५७५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली, तर ४३० धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास १२०० कोटी रुपयांची मदत केल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षचे तत्कालीन प्रमुख ओमप्रकाश शेटय़े यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, राज्यातील प्रत्येक गोरगरीब रुग्णांला चांगले उपचार मिळावे हा या मागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात या योजनेला गती दिली जाईल.

योजनेचा विस्तार

मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात हृदय शस्त्रक्रिया, फुप्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदूरोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल, तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये मदत मिळेल. याशिवायच्या अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. वरील निकषात कोणते रुग्ण बसू शकतात व त्यांना नेमकी किती मदत दिली जावी हे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली असून ती याबाबत निर्णय घेईल असे चिवटे यांनी सांगितले.

October 25, 2022 at 12:02AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.