मुंबई : दरवर्षी सप्टेंबरअखेर परतीचा प्रवास सुरू करणारा मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत रेंगाळल्यामुळे यंदा पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली आहेत. ऑक्टोबर अखेरीस सातही धरणात मिळून ९७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमध्ये सध्या ९७.३१ टक्के पाणीसाठा आहे. सातही धरणात मिळून सध्या १४ लाख ८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. या वेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्यास पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही. यंदा पाऊस चांगलाच लांबल्यामुळे ऑक्टोबर महिना संपत आला तरी धरणे काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे यावर्षी पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे.
हेही वाचा >>> दिवाळीच्या तीन दिवसात आगीच्या ८५ दुर्घटना ; फटाक्यांमुळे ३७ ठिकाणी आग
महाराष्ट्र आणि गोव्यामधून मान्सूनने आपला मुक्काम हलवल्याची घोषणा हवामान विभागाने मंगळवारी केली. दरवर्षी साधारणतः सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा संपलेला असतो. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून पाण्याचे नियोजन केले जाते. पुढीलवर्षी जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल यादृष्टीने नियोजन केले जाते. यंदा मात्र पाणीसाठ्याची पातळी चांगलीच वाढलेली आहे. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवापासून पडू लागलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली होती. दसऱ्यापर्यंत पाऊस पडत होता. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे मुंबई बाहेरच्या जिल्ह्यात असून या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यामुळे ही धरणे काठोकाठ भरली आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत धरणक्षेत्रात यंदा जास्त पाऊस पडला आहे.
तीन वर्षांचा २५ सप्टेंबरपर्यंतचा जलसाठा
वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) ….. टक्केवारी
२०२२ – १४,०८,४६६ …… ९७.३१ टक्के
२०२१ – १३,९८,४२४ …. ९६.६२ टक्के
२०२० – १३,७५,९७० …. ९५.०७ टक्के
October 25, 2022 at 09:40PM

via IFTTT