Type Here to Get Search Results !

पीएफआयशी संबंधीत ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ; मुंबईत पीएफआयच्या महाराष्ट्र सरचिटणीसावर कारवाई

मुंबईः राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या संघटनेचियी महाराष्ट्रातील सरचिटणीसासह ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मुंबईतही पवई पोलिसांनी पीएफआय एका पदाधिकाऱ्याला प्रतिबंधात्मक अटक केली. पीएफआयविरोधात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत असलेल्या कारवाई विरोधात तो ट्वीट करत असल्याचा आरोप आहे. तसेच सरकारविरोधी व धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह पोस्टही त्याने रिट्विट केल्याचा आरोप आहे.

पीएफआयशी संबंधीत कार्यकर्त्यांवर देशभरात एनआयएकडून कारवाई होत असताना राज्य पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नांदेड, परभणी, मालेगाव, अमरावती अशा विविध ठिकाणी राज्य पोलिसांनी ४७ जणांवर प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय काही व्यक्तींकडून गैर प्रकार न करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. काही जणांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतही मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत पीएफआयच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पवई पोलिसांना नुकतेच एक पत्र प्राप्त झाले होते.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २२ सप्टेंबरला पीएफआय विरोधात देशभर केलेल्या कारवाई विरोधात संघटनेचे सदस्य समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई आयआयटी मुख्य द्वारासमोरील हनुमान रोड परिसरात राहणारे पीएफआयचे महाराष्ट्र सरचिटणीस सईद अहमद सरदार अहमद खान यांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. तपासणीत ते २२ सप्टेंबरला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पीएफआय विरोधात देशभर केलेल्या कारवाई बाबत असंंतोष निर्माण होईल, अशी ट्वीट करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल, तसेच सरकार विरोधी काही आक्षेपार्ह ट्वीटही त्याने रिट्विट केल्याचे पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर सीआरपीसी कलम १५३(३) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला पवई पोलिसांनी अटक केली. खानविरोधात यापूर्वी कुर्ला पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खान हा पीएफआयचा राज्य सरचिटणीस, तसेच वित्त विभागाचा प्रभारीही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/Qa5tL6q
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.