Type Here to Get Search Results !

दहा हजार प्रवाशांच्या मोबाइलची चोरी

मुंबई : करोनाविषयक कडक निर्बंध हटविल्यानंतर हळूहळू सर्व कारभार पूर्ववत झाला असून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरीय रेल्वे आणि मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरीला गेलेल्या मोबाइलचा माग घेत लोहमार्ग पोलिसांना परराज्याची वाट धरावी लागत आहे. २०२१ पासून आतापर्यंत प्रवासादरम्यान १० हजार १५९ प्रवाशांचे मोबाइल चोरीला गेले असून यापैकी २,६१८ परराज्यातून हस्तगत करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रवासी लोकल प्रवासात किंवा फलाटावर मोबाइलवर बोलण्यात दंग असतात. हेच हेरून चोर प्रवाशांचा मोबाइल हिसकावून पळ काढतात. मुंबई विभागात जानेवारी २०२१ पासून ऑगस्ट २०२२ पर्यंत १० हजार १५० मोबाइल चोरीचे गुन्हे लोहमार्ग पोलिसांकडे नोंद  झाले आहेत. यापैकी ३,७४३ गुन्ह्यांची उकल झाली असून २,६१८ मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यात आले आहेत. अनेक वेळा चोरलेले मोबाइल परराज्यात विकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

परराज्यांत विक्री

मुंबई विभागातून चोरीला गेलेले मोबाइल महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, ओदिशा, दिल्ली, हरियाणा, पंजाब, केरळ, जम्मू काश्मिरसह अन्य राज्यांतून हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीला गेलेले मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे विशेष पथकही तैनात करण्यात येते.

September 30, 2022 at 12:02AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.