मुंबई : ‘डी. एन. नगर – मंडाले – मानखुर्द मेट्रो २ ब’ प्रकल्पात एक मोठा अडथळा दूर करण्यात अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे. चिता कॅम्प येथील ४०० झोपड्या हटवण्यात आल्या असून आता प्रकल्पाच्या कामाला वेग येईल, असा आशावाद एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
डी. एन. नगर – मंडाले दरम्यान २३.६४३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम एमएमआरडीए करीत आहे. २० स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेसाठी १० हजार ९८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. चिता कॅम्प परिसरातील ४०० झोपड्या या प्रकल्पात अडथला बनल्या असून हटविणे आवश्यक होते. अखेर एमएमआरडीएने या झोपड्या हटविण्याल्या असून प्रकल्पाच्या कामाल गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रहिवाशांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याच्या आधारे पात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथील झोपड्या पाडण्यात आल्या, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/A0CYLt4
via IFTTT