पावसाळानंतर विविध कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई विमानतळ) दोन्ही धावपट्ट्या येत्या १८ ऑक्टोबरला सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी, या काळात विविध कंपन्यांच्या विमान सेवा रद्द कराव्या लागणार असून या विमान सेवेसाठी आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना मनस्ताप होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार
मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ०९/२७ अशी मुख्य, तसेच पर्यायी धावपट्टी आहे. ही धावपट्टी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांत देखभाल, दुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ नंतर पुन्हा धावपट्टी विमान उड्डाणासाठी खुली करण्यात येणार आहे. धावपट्टीच्या दुतर्फा असलेले दिवे, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या काळातील विमान उड्डाणांबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाने केले आहे.याआधी दोन्ही धावपट्ट्या पावसाळापूर्व कामांसाठी १० मे रोजी सहा तास बंद ठेवण्यात आल्या होत्या. सध्या विमानतळावर दररोज ८०० हून अधिक विमान उतरतात आणि उड्डाणे होतात. मुंबई विमानतळावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/aFhujkD
via IFTTT