Type Here to Get Search Results !

मुंबईत गुरूवारी १५ टक्के पाणी कपात; काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा खंडित

मुंबई : संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

भांडुप मध्ये गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम) , रमाबाई नगर १ आणि २ , दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर, खिंडीपाडा, श्रीरामपाडा, राजारामवाडी येथेही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. साई हिल, टेंभीपाडा, एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर, रामनगर, तानाजीवाडी येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे भांडुप संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्‍याचे काम करण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी कपात करण्यात येणार आहे.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/Vt5kBbK
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.