मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा आणि शिवसैनिकांचे नाते अतूट असून कुणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी शिवाजी पार्कवर आमचाच दसरा मेळावा होणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महानगरपालिकेने परवानगी दिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात त्यावरून जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यावर भाष्य केले.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार याबाबत कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी तो खुशाल करावा. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा ‘तांत्रिक-मांत्रिक’ भाग आहे. ते नंतर बघू, पण आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हिंदुत्ववादी, मुस्लीम कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. साधारण पक्ष प्रवेशासाठी सत्ताधारी पक्षाकडे रांग लागते, पण आज वेगळे चित्र दिसत आहे, असे ते म्हणाले.
‘मातोश्री’चे दरवाजे खुले
खोटय़ा आणि भ्रामक हिंदुत्वाच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे ज्यांना वाटते, खरे हिंदुत्व शिवसेनेचे आहे असे ज्यांना वाटते, त्यांना शिवसेनेचे तसेच ‘मातोश्री’चे दरवाजे उघडे आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी आपण आमच्या साथीला यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
August 30, 2022 at 12:02AM

via IFTTT