Type Here to Get Search Results !

गुजरात दंगल : सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATSने घेतले ताब्यात

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या क्लिनचीटला आव्हान देणारी माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आणि एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. हा निकाल देताना न्यायालयाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएस अॅक्शन मोडमध्ये आली असून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. त्यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेटलवाड यांचे नाव घेतले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >> “मलाही अटक करण्यात आली होती, पण …”; गुजरात दंगलप्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

२००२ सालाच्या गुजरात दंगलीमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला झाला होता. त्यानंतर एहसान जफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी एसआयटीने मोदी यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने मोदी तसेच इतरांवरील आरोप फेटाळून लावत एसआयटीचा अहवाल कायम ठेवला. त्यानंतर एएनआयशी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी दंगलीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच या मुलाखतीदरम्यान, त्यांनी तिस्ता सेटलवाड यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता एटीएसने सेटलवाड यांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना सध्या सांताक्रूझ येतील पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

हेही वाचा>>> उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीला अटक

अमित शाह काय म्हणाले होते?

सुप्रिम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर अमित शाह यांनी एएनआयला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ज्यांनी आरोप लावले त्यांनी आज पंतप्रधान मोदी आणि भाजपाची माफी मागायला हवी, अशी मागणी केली. तसेच एका प्रश्नाचे उत्तर देताना सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचा उल्लेख केला. “६० लोकांना जिवंत जाळण्यात आले त्यातून समाजात आक्रोश निर्माण झाला. जोपर्यंत दंगल झाली नाही तोपर्यंत भाजपाशिवाय कोणीही यावर टीका केली नाही. काँग्रेसने एक शब्दही काढला नाही. सुप्रीम कोर्टाने आज हेही सांगितले की झाकिया जाफरी या दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत होत्या. एनजीओने अनेक पीडितांच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली असून त्यांना याची माहितीही नव्हती. तीस्ता सेटलवाड यांची एनजीओ हे सर्व करत होती आणि त्यावेळच्या यूपीए सरकारने एनजीओला खूप मदत केली हे सर्वांनाच माहीत आहे. मोदींना दंगलीच्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी हे केले गेले. ही लढाई मोदींनी संयमाने लढली आणि आज सत्य बाहेर आले आहे,” असे अमित शाह म्हणाले होते.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/qTFl45f
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.