Type Here to Get Search Results !

परिचारिकांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे..राज्यातील परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

भरतीबरोबर परिचारिकांच्या १२ मागण्या

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांनी भरती बरोबरच १२ मागण्या केल्या होत्या. या १२ मागण्यांबाबत तसेच परिचारिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील, तसेच काही मागण्यांबाबत इतर विभागाचे अभिप्राय घेणेही आवश्यक असल्याने ते लवकरात लवकर घेतले जातील असे आश्वासन अमित देशमुखांनी दिले आहे. येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत याबाबत पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/Ed06IfT
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.