Type Here to Get Search Results !

शरद पवारांच्या हाती ठाकरे सरकारची सूत्रं?; उद्धव ठाकरेंनी सांगितली खरी परिस्थिती

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी सत्तेची सूत्रं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातही शरद पवारांकडे आहेत अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलताना या टीकेवर उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे, भोंगा, राणा दांपत्य तसंच हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडलं.

“असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिलेत,” राज ठाकरेंच्या सभेआधी उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले “अशा खेळाडूंकडे…”

“करोनामुळे २ वर्षे नाटक, चित्रपट बंद, आता फुकटात करमणूक मिळत असेल तर का नको?”, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

“मी अशा आरोपांचा विचार करत नाही. ज्यांना बोंबलायचं आहे त्यांना बोंबलू द्या. सरकार उत्तम चाललं आहे. शरद पवारांबद्दल बोलायचं झालं ते वडीलधारी आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “त्यावेळी त्यांच्या वागणुकीत मस्ती किंवा रुबाब नसतो. एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणे येतात, मुद्देसूद बोलतात, थोड्या गप्पा होतात आणि चांगलं सरकार चाललं आहे. त्यामुळे सूत्रं वैगेरे असं काही नाही. तिघं एकत्र मिळून काम करत आहोत. एकत्र हे एकच सूत्र आहे”.

“काहीच मिळत नसलं की खोटे आरोप करा, बदनामी करा हे सगळं सुरु असतं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान यावेळी त्यांना काही शिवसेना नेते उघडपणे नाराजी जाहीर करत असल्यासंबंधी विचारलं असता म्हणाले की, “२५ आमदार नाराज असल्याचं काहींनी दिलं होतं. ते नाराज नव्हते, अर्थाचा अनर्थ लावण्यात आला होता. मी नाकारु शकलो असतो. पण त्यामध्ये काही कामं सुरुवातीच्या काळात रखडल्याचं होतं. त्यामुळे अर्थगती मंदावली होती. निधी आणायचा कुठून हा प्रश्न होता. ही सर्वपक्षीय चर्चा होती. मी मुख्यमंत्री असल्याने ग्रामीण भागातील लोक येऊ शकत नाहीत मग ते लोकप्रतिनिधींना विचारणा करतात. आता गेल्या आठवड्यात मी त्या आजींच्या घरी गेलो होतो. तिथेसुद्धा महिला पाण्याचा प्रश्न असल्याचं सांगत होत्या. हे प्रश्न सोडवायला पाहिजेत. त्रागा करुन चालणार नाही”.

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/InMmxZq
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.