Type Here to Get Search Results !

पुराचा धोका हे मानवनिर्मित संकट!; फसलेल्या नियोजनाचे परिणाम असल्याचे अजोय मेहता यांचे मत

मुंबई : दरवर्षी पावसाळय़ात मुंबईत पाणी तुंबते, लोकल गाडय़ा बंद पडतात, रस्ते पाण्याखाली जातात, मुंबईला असलेला हा पुराचा धोका म्हणजे नैसर्गिक आपत्तीऐवजी मानवनिर्मित संकट आहे. या मानवनिर्मित संकटाचा सामना करण्यासाठी मानवनिर्मित उपाययोजनांचीच गरज आहे. मुंबईत पाणी तुंबण्याची ही समस्या म्हणजे फसलेल्या नियोजनाचेच परिणाम आहेत, असे मत माजी मुख्य सचिव आणि माजी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केले.

‘मुंबई महानगराला असलेला पुराचा धोका’ या विषयावर आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी झाला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अजोय मेहता उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते. मुंबई महापालिका आणि वल्र्ड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांत विविध तज्ज्ञांनी या पूर जोखीम कार्यशाळेत निरनिराळे मुद्दे उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अतिवृष्टीने मुंबईत पाणी तुंबणे ही दरवर्षीची परिस्थिती असते. ही परिस्थिती निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित याबाबत सतत चर्चा होत असते. मुंबईतील पुराचा धोका मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट मत मेहता यांनी व्यक्त केले. तसेच या आपत्तीसाठी दरवेळी निसर्गाला जबाबदार धरले जाते. मात्र नियोजन फसल्यामुळे ही परिस्थिती ओढवत असते, असे सांगताना त्यांनी आपल्या कार्यकाळातील काही अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हिंदूमाता परिसरात पाणी साचू नये यासाठी केलेले प्रयोग का फसले याबाबतचे काही अनुभव त्यांनी या वेळी कथन केले.

उदंचन केंद्र बांधले, पण उदंचन केंद्रापर्यंतच्या जलवाहिनीला उतारच कमी दिला, पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये झाडांची मुळे आढळून आली, बांधकाम करताना सिमेंटच्या गोणी आत राहिल्या आदी कारणांमुळे विविध ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याचे आढळून यायचे. सगळय़ांनी आपापले काम चोख केले तर पुराच्या समस्येवर तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. 

पर्जन्य जलवाहिन्यांवर एवढा खर्च करावा का?

मुंबईत वार्षिक अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी सर्वाधिक पाऊस हा जुलै व ऑगस्टमध्ये पडतो. मोजके काही दिवस अतिवृष्टी होते व पाणी साचते. मुंबईची पर्जन्यजल वाहून नेणारी यंत्रणा ही ताशी पन्नास मिली पावसाचे पाणी वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यापेक्षा जास्त पाऊस पडला की यंत्रणा अपुरी पडते. मात्र केवळ पावसाचे दोन महिने नाले आणि पर्जन्य जलवाहिन्यांचे काम असते. बाकीचे वर्षभर या वाहिन्या कोरडय़ा असतात. मग उघडय़ा नाल्यांमध्ये लोक कचरा टाकतात व पुन्हा पुढल्या वर्षी पाणी साचते. मग केवळ या दोन महिन्यांच्या कालावधीत कधी तरी होणाऱ्या अतिवृष्टीसाठी एवढा कोटय़वधींचा खर्च करावा का, असा सवाल माजी आयुक्त जयराज फाटक यांनी केला. परदेशात जेवढा पाऊस वर्षभरात पडतो, तेवढा पाऊस इथे एका महिन्यात तर कधी एका दिवसातही पडतो. त्यातच मोठय़ा प्रमाणावर झालेल्या शहरीकरणामुळे मुंबईला पुराचा धोका कायम असल्याचे मत फाटक यांनी व्यक्त केले.

April 30, 2022 at 12:02AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.