मुंबई: कमी व्याज दरात ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला भाग पाडून खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अंधेरी पूर्व येथे वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय महिलेच्या बाबतीत असाच प्रकार घडला असून आरोपीने सांगितलेली रक्कम न दिल्याने महिलेच्या दिराला तिचे छायाचित्र व अश्लील संदेश पाठवून बदनामी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करीत आहेत. कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी महिलेची बदनामी केल्याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी एका तरुणाला कर्नाटकातून अटक केल्यानंतर आता अंधेरी पूर्व येथे वास्तव्यास असलेल्या महिलेच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. तक्रारदार महिला मरोळ परिसरातील रहिवासी असून ५० हजार रुपये कर्ज देण्यासाठी आरोपीने त्यांना डिस्कवर लोन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले होते. २१ एप्रिलला त्यांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर आरोपीने केवळ तीन हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर या महिलेला कर्जाच्या रकमेपोटी केवळ १७०० रुपये पाठवले. मात्र ५० हजार रुपयांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी तात्काळ कर्जाची रक्कम परत केली. त्यावेळी आरोपीने तीन हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मंगळवारी तक्रारदार महिलेच्या दिराला तिचे छायाचित्र पाठवून कर्जाची रक्कम परत करण्यासाठी ती वेश्याव्यवसाय करत असल्याचा संदेश पाठवला. हा प्रकार महिलेला कळल्यानंतर तिने तात्काळ याप्रकरणी सहार पोलिसांकडे तक्रार केली. खंडणी, विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमका प्रकार काय?
सध्या विविध ऑनलाइन ॲपव्दारे नागरिकांना कमी कालावधीचे ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून वेगवेगळय़ा आकर्षक कर्जाचे प्रस्ताव देण्यात येत आहेत. कमी व्याजदर ठेवून कमी वेळेत कर्ज मंजूर करून देतो अशा प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांना ऑनलाइन कर्ज घेण्यास भाग पाडण्यात येत आहे. नागरिकांना कर्ज घेण्याकरिता कंपनीचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगण्यात येते. त्यानंतर त्यांच्या मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफिती अशी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस शेअर करण्याचे बंधन घालून नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. संबंधित व्यक्तीने कंपनीचे कर्ज फेडल्यानंतरही त्यांना अधिक रक्कम भरण्याची सक्ती करण्यात येते.
ग्राहकाने त्यास विरोध केल्यास ते कर्ज मंजूर करताना ग्राहकाने सादर केलेल्या त्याच्या फोनमधील माहितीव्दारे संबंधित व्यक्तीला व त्याचे नातेवाईक-मित्रमंडळींना शिवीगाळ, अश्लील छायाचित्र अथवा चित्रफीत पाठवून अधिक पैसे भरण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत ॲपव्दारे कर्ज घेऊ नका व कमी कालावधीचे ऑनलाइन कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका. तसेच कोणासोबत असा प्रकार घडल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.
April 28, 2022 at 12:54AM

via IFTTT