Type Here to Get Search Results !

आभासी चलनाच्या नावाने २७ जणांची फसवणूक; माटुंगा, पंतनगरनंतर चेंबूरमधील घटना

मुंबई : माटुंगा, पंतनगरनंतर आता चेंबूर येथेही आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली २७ जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ५१ वर्षीय गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात फसवणूक झालेल्या व्यक्तींचा आकडा मोठा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारदार राजेश आवळे हे मालमत्ता खरेदी विक्रीत मध्यस्थ म्हणून (रिअल इस्टेट एजंट) काम करतात. त्यांच्या मित्राने १७ जानेवारीला एचपीएस एक्स्चेंज या ऑनलाइन ॲप्लिकेशनमध्ये आभासी चलनात गुंतवणूक केल्यास आठवडयामध्ये सहा दिवस दररोज साडे सात टक्के नफा आणि एक दिवस १० टक्के तोटा होतो. पण ते ॲप्लिकेशन गुगल प्लेवर उपलब्ध नसल्यामुळे मोबाइलद्वारे डाऊनलोड करावे लागते, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी १५ दिवस पाहिले असता मित्राला दररोज साडे सात टक्के नफा मिळत होता. त्यामुळे आवळे यांचा विश्वास बसला व त्यांनी १५ हजार रुपये युपीआय आयडीवर पाठवले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपवर सहभागी करण्यात आले. त्यानंतर त्यांना एचपीएस एक्सचेंज या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले.
गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना होणाऱ्या फायद्याचे पुरावे या ग्रुपवर दररोज पाठवले जायचे. त्यामुळे ६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत आवळे यांनी ६० हजार रुपये विविध युपीआय आयडीवर पाठवले. या ग्रुपवर १५ हजार सदस्य होते. ॲप्लिकेशन आता प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार असल्यामुळे त्यातून तीन दिवस कोणीही पैसे काढू शकणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तीन दिवस कोणीच ॲप्लिकेशनकडे लक्ष दिले नाही. अचानक २४ फेब्रुवारीला सर्वाना टेलिग्राम ग्रुपमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी ॲबप्लिकेशनमध्ये पाहणी केली असता तेथूनही रक्कम काढता आली नाही. नंतर टेलिग्राम ग्रुपच्या ॲडमिनशी सर्व गुंतवणूकदारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. अखेर आवळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आवळे यांच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. २७ गुंतवणूकदार आवळे यांच्यासह २६ जणांनी पाच हजारपासून अगदी ८० हजार रुपयांपर्यंत पैसे जमा केले. आतापर्यंत २७ गुंतवणूकदारांनी मिळून पाच १० हजार रुपये विविध युपीआय आयडीद्वारे जमा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही पंतनगर येथे ३६७ गुंतवणूकदारांची सुमारे तीन कोटींची तर तसेच माटुंगा येथे ७०० जणांची २३५ कोटींची फसवणुकीची घटना घडली होती.

April 05, 2022 at 12:20AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.