मुंबई : खासगी विद्यापीठांच्या मनमानी शुल्क वसुलीला चाप लावण्यासाठी शुल्क नियमनाकरिता समिती गठित करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयास विद्यापीठाचा दर्जा देणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
पुण्यात सुरू होणाऱ्या डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे विधेयक संमत करताना झालेल्या चर्चेत बोलताना खासगी विद्यापीठावर शुल्काबाबत कोणताही अंकुश नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. पारंपरिक अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या खासगी विद्यापीठांना परवानगी नको, केवळ नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यापीठांनाच परवानगी द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यावर खासगी विद्यापीठांचे शुल्क कसे असावे याबाबत समिती गठित करण्याची घोषणा सामंत यांनी केली. भाजप सरकारच्या काळात अशाच प्रकारे २१ खासगी विद्यापीठांना परवानगी देण्यात आली असून त्याचप्रमाणे हे विद्यापीठ असेल असेही सामंत यांनी सांगितले. तसेच मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयास विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून विदर्भातील गोंडवणा व्दियापीठास आदिवासी आणि वन विद्यापीठाचा दर्जा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/JoXhuHC
via IFTTT