Type Here to Get Search Results !

संप मागे घ्या!; राज्यातील विद्यार्थ्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई: राज्यातील एसटी सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून ग्रामीण भागात शाळा गाठण्यासाठी तासन्तास पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी ग्रामीण भागात एसटी फेऱ्यांचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिले असले तरीही सध्या धावत असलेल्या पाच हजार बसगाडय़ांमधून राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची समस्या कशी सुटणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

हाल थांबावे यासाठी संप मागे घेण्याचे आवाहन आता राज्यातील विद्यार्थ्यांकडूनच एसटी कर्मचाऱ्यांना केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाधरे गावात राहणारी समीक्षा पाष्टे (१६) दहावीचे शिक्षण घेत आहे. उभरी या अन्य गावात आठवीपासून ते दहावीपर्यंत शाळा आहे. सध्या १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाल्याने समीक्षा पाधरे गाव ते उभरी असा प्रवास खासगी रिक्षाने करते.  दररोज जाण्या-येण्यासाठी ५० रुपये खर्च होतात.  आता नाइलाजाने  आणि वेळ वाचावा यासाठी जाण्या-येण्यासाठी रिक्षासाठी पैसे द्यावे लागत असल्याचे ती म्हणाली.

मालवण तालुक्यात देवली गावात राहणारे वेदांत चव्हाणही दहावीचे शिक्षण घेत असून सहा किलोमीटर अंतरावरील रेकोबा हायस्कूल येथे परीक्षेसाठी ये-जा करावी लागते. एसटी नसल्याने सकाळी ११ वाजता असलेल्या परीक्षेसाठी दीड ते दोन तास आधीच निघावे लागत असल्याचे वेदांत म्हणाला.

 परीक्षेला जाण्यासाठी दररोज जाताना एक तास आणि येताना एक तासाची पायपीट करावी लागत असून त्याचा बराच त्रास सहन करावा लागतो. गावातील साधारण ३५ ते ४० मुले दररोज दुसऱ्या गावातील हायस्कूलमध्ये जाण्यासाठी पायपीट करत असल्याचे वेदांत म्हणाला.

लाखो विद्यार्थ्यांना आधार

करोनाकाळाआधी सुरू असलेल्या एसटीतून दररोज १९ लाख विद्यार्थ्यांची एसटीतून वाहतूक होत होती.

नियोजन अवघड 

विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून शाळांच्या मार्गावर जास्त गाडय़ा सुरू करण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिली असली तरीही राज्यात प्रत्यक्षात फक्त पाच हजार गाडय़ांच्या (एसटीच्या ताफ्यात एकूण १६ हजार गाडय़ा आहेत) १४ हजार फेऱ्या होत असून त्याचे नियोजन करण्याचे आव्हान एसटी महामंडळासमोर आहे.

परीक्षा व शाळांच्या वेळांचा अभ्यास करतानाच एसटी फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करून त्यांच्या स्वतंत्र फेऱ्या तातडीने चालनात  आणाव्यात, असे आदेशही महामंडळाने राज्यातील एसटीच्या संबंधित विभागांना दिले आहेत.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/FMzeimp
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.