परब यांचा संबंध असल्याचा सोमय्या यांचा दाव
मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांचे दापोली समुद्रकिनाऱ्यावरील ‘साई रिसॉर्ट एन एक्स’ आणि ‘सी क्राँच रिसॉर्ट’ तोडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने दिले असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.
ही अनधिकृत रिसॉर्ट सागरी किनारा नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) पर्यावरणविषयक नियमांचा भंग करुन बांधण्यात आल्याने ती पाडण्याचे आणि बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रिसॉर्टच्या बांधकामांशी आपणला काहीच संबंध नसल्याचे आणि सोमय्या हे खोटे आरोप करीत असल्याचे परब यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.
या रिसॉर्टच्या बांधकामांविरोधात सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याकडे तक्रार केली होती आणि केंद्रीय पथकाने दापोलीला जाऊन पाहणीही केली होती. रिसॉर्टचे बांधकाम अनधिकृत असून सीआरझेड नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने ते ताबडतोब पाडण्याचे आदेश केंद्रीय पर्यावरण खात्याने पर्यावरण कायद्याच्या कलम ५ नुसार महाराष्ट्र पर्यावरण क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणास दिले आहेत.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर येथील विभागीय संचालकांनी ही रिसॉर्ट व त्यांच्या मालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
The post दापोलीतील २ अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचे आदेश; परब यांचा संबंध असल्याचा सोमय्या यांचा दावा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/knHruAtvm
via IFTTT