मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील आणखी एक साक्षीदार गुरुवारी फितूर झाला. त्यामुळे खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या १७ झाली आहे. या प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आपला छळ करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची नावे घेण्यास भाग पाडल्याचा दावा या साक्षीदाराने केल्यानंतर विशेष न्यायालयाने त्याला फितूर घोषित केले.
सध्या या खटल्याची नियमित सुनावणी सुरू असून गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी या साक्षीदाराने आपण स्वेच्छेने जबाब दिला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी त्याला फितूर साक्षीदार जाहीर केले. एटीएसने आपल्याला अनेक वेळा ताब्यात घेतले आणि आपली छळवणूक केली. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला रा. स्व. संघ आणि संघाच्या नेत्यांची नावे घेण्यासही भाग पाडले. आपण संघाचा कार्यकर्ता नाही आणि आपल्याला संघाच्या नेत्यांची नावेही माहीत नाही, असा दावा या साक्षीदाराने त्याला फितूर जाहीर करण्यापूर्वी केला.
The post मालेगाव बॉम्बस्फोट; आणखी एक साक्षीदार फितूर appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/oGe3KCiY9
via IFTTT