Type Here to Get Search Results !

शालेय अभ्यासक्रमामध्येच तंबाखू व्यसनाबाबत जनजागृती आवश्यक

किशोरवयीन बालकांमधील व्यसनाला आळा घालण्यासाठी ‘आयआयपीएस’ संस्थेची शिफारस

मुंबई : किशोरवयीन बालकांमध्ये दहाव्या वर्षांपासूनच तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन लागत असल्यामुळे या वयोगटामध्ये शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे, अशी शिफारस राज्यात जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थेने (आयआयपीएस) केली आहे.  आयआयपीएस संस्थेने राज्यातील १३ ते १५ वयोगटातील बालकांमधील व्यसनाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण केले असून याचा अहवाल नुकताच संस्थेने जाहीर केला आहे. यानुसार काही धोरणात्मक शिफारशी संस्थेने राज्य सरकारला केल्या आहेत.  राज्यभरात किशोरवयीन बालकांमध्ये व्यसनाचे प्रमाण सुमारे ५.१ टक्के आहे. मिझारोम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये हे प्रमाण सुमारे ५७ टक्के आहे. देशाच्या तुलनेत राज्यामध्ये हे प्रमाण तुलनेने कमी असले तरी बालकांमधील विशेषत: मुले आणि शहरातील युवावर्गामध्ये व्यसनाचे प्रमाण कमी होण्यासाठी लक्ष्यधारित प्रयत्न होणे आवश्यक आहे.

घरामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बहुतांश वेळा धूम्रपान करीत असल्याचे या सर्वेक्षणामध्ये बालकांनी नमूद केले आहे. घरामध्ये धूम्रपान केल्यामुळे बालकांवर होणारे परिणाम याबाबत पालकांनाही जागृत करणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी ही धूम्रपान करण्यास मज्जाव करणे आवश्यक आहे, असे या शिफारशीमध्ये नमूद केले आहे. पानाचे ठेले किंवा दुकाने यामध्ये दर्शनी भागात मोठय़ा अक्षरांमध्ये बालकांना तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करू नये असे फलक लावण्यात यावेत. बालके आठव्या किंवा नवव्या वर्षीच व्यसनाकडे वळत असल्याचे या सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. तेव्हा प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर व्यसनाबाबत जनजागृतीचे कायर्कम हाती घ्यावेत. तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत माहिती किंवा जागृती करणारी माहिती शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावी. तसेच तंबाखूविरोधी कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, आदी शिफारशी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केल्याची माहिती आयआयपीएसचे आर. नागराजन यांनी दिली.

चर्चेनंतर शिफारशींवर अंमलबजावणी

 सर्वेक्षणात आढळलेल्या बाबींनुसार संस्थेने धोरणात्मक शिफारशी आमच्याकडे केल्या आहेत. या शिफारशींवर चर्चा केली जाईल आणि यांची अंमलबजावणी करण्याबाबत उपाययोजना केल्या जातील, असे आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

The post शालेय अभ्यासक्रमामध्येच तंबाखू व्यसनाबाबत जनजागृती आवश्यक appeared first on Loksatta.

March 01, 2022 at 12:53AM

via IFTTT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.