सर्व करोनाबाधितांच्या उपचारांसाठी एकत्रित व्यवस्था
मुंबई: मुंबईत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता ओमायक्रॉनबाधित आणि करोनाच्या इतर प्रकारांचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था न ठेवता एकाच ठिकाणी उपचार आणि विलगीकऱण करण्यात येणार आहे.
मुंबईत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून येणाऱ्या विविध देशांमधील प्रवाशांच्या चाचण्या पालिकेने सुरू केल्या. त्यातील करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमार्फत ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांची सेव्हन हिल्स रुग्णालयात स्वतंत्र विभागात व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांच्या विलगीकरणासाठीही स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली. मुंबईत विविध देशांमधून सुमारे सात हजार नागरिक रोज हवाईमार्गे मुंबईत दाखल होतात. त्यातील जोखमीच्या देशांमधून येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विलगीकरण सुविधा वाढविणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार आता पालिकेने वांद्रे- कुर्ला संकुलातील करोना केंद्रामध्ये ५०० खाटांचे विलगीकरण केंद्र आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुरू केले आहे.
मुंबईत ३१७ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. यातील १६० रुग्ण हे मुंबईचे रहिवासी आहेत. मुंबईत वेगाने वाढणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्के हे ओमायक्रॉनबाधित आहेत, तर येत्या काही दिवसांत ही संख्या १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाबाधित आढळणाऱ्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनबाधित आणि इतर करोनाबाधित असा फरक न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत आता बहुतांश रुग्ण ओमायक्रॉनबाधित असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे शक्य नाही. रुग्ण ओमायक्रॉनबाधित असले तरी लक्षणे आणि आजाराचे स्वरुप यात फारसा फरक नाही. उलट त्याचे स्वरूप डेल्टाच्या तुलनेत सौम्य आहे. त्यामुळे आता रुग्णांमध्ये फरक न करता ते जसे दाखल होतील तसेच एकाच ठिकाणी दाखल करण्यात येतील, असे पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
परदेशी प्रवाशांसाठी विलगीकरणाची सोय
परदेशी प्रवाशांमध्ये ज्यांना हॉटेल परवडणार नाही, त्यांच्यासाठी बीकेसी आणि कांजुरमार्ग येथे विलगीकरण आणि उपचारांची सुविधा सुरू केली आहे. बीकेसीमध्ये ५०० तर कांजूरमार्ग येथे ६०० खाटा उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त आता प्रत्येक विभागात सीसीसी२ म्हणजे करोना दक्षता केंद्रामध्ये ५०० खाटा सुरू केल्या आहेत. झोपडपट्टी भागांमध्ये संसर्ग हळूहळू होत असल्यामुळे त्यांना घरात विलगीकरण शक्य नसल्यामुळे ही सुविधा केली असल्याची माहिती, काकाणी यांनी दिली.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान शाळेतच तपासणी
करोनाबाधितांच्या नमुन्यांची जनुकीय चाचणी कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत केली तरी पुण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये काही नमुने पाठवावे लागतात. त्यांचे अहवाल येईपर्यंत तेथून अहवाल आलेले असतात. त्यामुळे दोन वेळेस एकाच नमुन्यांची चाचणी करून संसाधनाचा विनाकारण वापर करणे योग्य नाही. त्यामुळे आता नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान शाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले जातील. आवश्यकता भासल्यास कस्तुरबामध्ये चाचण्या केल्या जातील, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
अन्य आरोग्य सेवा सुरूच
करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ३१ मार्चपर्यत जम्बो केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. करोना व्यतिरिक्त आरोग्य सेवा सुरूच राहतील रुग्णसंख्या वाढली तरी १० टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण फारसा वाढलेला नाही. त्यामुळे सध्या तरी करोना व्यतिरिक्त अन्य आरोग्य सेवा बंद करण्याचा विचार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
The post ओमायक्रॉनचा भेदाभेद दूर; सर्व करोनाबाधितांच्या उपचारांसाठी एकत्रित व्यवस्था appeared first on Loksatta.
January 05, 2022 at 12:16AM

via IFTTT