Type Here to Get Search Results !

सागरी मार्गासाठी तरतुदीपेक्षा खर्च जास्त

राखीव ठेवीमधून आणखी ५०० कोटींचा निधी घेणार

मुंबई : सागरी किनारा मार्गाचे काम वेगात सुरू असून या प्रकल्पासाठी या वर्षी तरतूद केलेले २००० कोटी आतापर्यंत संपूर्ण खर्च झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अजून काही महिने असल्यामुळे अतिरिक्त ५०० कोटींचा निधी विशेष पायाभूत निधीमधून घेण्यात येणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते  वांद्रे वरळी सी िलकच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेतर्फे  सागरी किनारा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गाची  लांबी १०.५८ किलोमीटर असणार आहे.  ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प आहे.  मात्र, जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सात महिने या प्रकल्पाचे काम पूर्ण थांबले होते. त्यानंतर टाळेबंदीमुळे कामगार मिळत नसल्यामुळे हे काम रखडले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे. तर डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने निश्चित केले आहे. त्यामुळे युद्धपातळीवर प्रकल्पाचे काम सुरू आहे.

तब्बल १२ हजार ३७७ कोटी रुपयांचा हा एकूण प्रकल्प असून २०२१-२२ या आर्थिक वर्षांत पालिकेने २००० कोटींची तरतूद केली होती. त्यातून आतापर्यंत या कामावर पालिकेने १ हजार ९९६ कोटी खर्च केले आहेत. जानेवारी २०२२ पर्यंत या कामासाठी आणखीन ५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे ५०० कोटी रुपये ‘विशेष निधी’ (पायाभूत सुविधा विकास निधी) मधून उपलब्ध वरळीत करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. आधीच सागरी किनारा मार्ग प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून होत असताना या प्रस्तावावरून पुन्हा एकदा समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या कामांतर्गत कंत्राटदार, सल्लागार व साधारण सल्लागार यांना त्यांचा कामाचा मोबदला जानेवारी २०२२ पर्यंत देण्यासाठी ५०० कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे हा निधी काढण्यात येणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १२,७२१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत या प्रकल्पत्रिता साडेतीन हजार कोटींचा खर्च झाला असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

चौकट 

पायाभूत सुविधा विकास निधीतून पालिकेच्या ८० हजार कोटींच्या मुदत ठेवींमधून सुमारे ५० हजार कोटींचा निधी हा विविध पायाभूत प्रकल्पांसाठी संलग्नित करण्यात आलेला आहे. हा निधी मुंबईतील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी वापरण्यात येणार असल्याची खात्री पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात दिली होती. त्यानुसार हा निधी मागण्यात आला आहे.

The post सागरी मार्गासाठी तरतुदीपेक्षा खर्च जास्त appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/330RqLL
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.