अर्थसंकल्पातील तरतुदींचा वेध घेणारे ‘लोकसत्ता विश्लेषण’ उद्या सायंकाळी
मुंबई : देशाची अर्थव्यवस्था करोनाच्या परिस्थितीतून सावरत असताना यंदाच्या अर्थसंकल्पावर विविध घटकांचे आशा-अपेक्षांचे ओझे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी, १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडतील त्यातून त्या खरेच पूर्ण होतील की त्या सर्वसमावेशक दिलासा म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया रचणाऱ्या परिपूर्ण धोरण आराखड्याला महत्त्व देतील, याचा ऊहापोह ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष अर्थसंकल्पोत्तर कार्यक्रमातून येत्या मंगळवारी सायंकाळी केला जाईल.
केंद्रीय अर्थसंकल्पात झालेल्या तरतुदी आणि घोषणांचा आढावा घेणारा ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ सह-प्रायोजक असलेला हा ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रम दूरचित्रसंवाद माध्यमातून मंगळवारीच सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे अर्थमंत्र्यापुढे असणारी आव्हाने पाहता त्यांनी साधलेल्या कसरतींचा या निमित्ताने आढावा घेतील. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर त्यांच्याशी संवाद साधतील. वाचकांनाही या कार्यक्रमात सहभागी होऊन, २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातून घ्यावयाच्या अर्थबोधाचा उलगडा करता येईल.
यंदाच्या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, करदाते, गुंतवणूकदार या प्रत्येकाच्या हाती काही लागणार आहे की त्यांच्या हातातून काढून घेतले जाणार आहे, ते उलगडून सांगण्याची परंपरा ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून यंदा देखील पार पाडली जाणार आहे. सूट, सवलती, करमाफी, तरतुदीत वाढीच्या मागण्यांच्या त्यांच्या अपेक्षा आहेतच. शिवाय, वाढती महागाई, वाढती बेरोजगारीची समस्या आ वासून उभी आहे. ही आव्हाने पाहता अर्थमंत्र्यांकडून उत्पन्न आणि खर्चाचे अंकगणित कसे जुळविले जाईल, याची समीक्षा उद्बोधक ठरेल. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पाहता, मतपेटीवर नजर ठेवून लोकानुनयाचा सोपा मार्ग त्या अनुसरतील, याबद्दलही उत्सुकता आहे.
अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण
’कधी : मंगळवार ,
१ फेब्रुवारी २०२२
’वेळ : सायंकाळी ६ वाजता
’वक्ते : गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता
’संवादक : सिद्धार्थ खांडेकर, वरिष्ठ साहाय्यक संपादक, लोकसत्ता
सहभाग कसा?
दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात सहभागासाठी http:// tiny. cc/ LS_ Budget Vishleshan_2022 येथे नोंदणी आवश्यक.
’ सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड
The post अर्थसंकल्पातील घोषणांमागील ‘अर्थ’ समजून घेण्यासाठी…; अर्थसंकल्पातील तरतुदींचा वेध घेणारे ‘लोकसत्ता विश्लेषण’ उद्या सायंकाळी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2Dt0QHGMw
via IFTTT