मुंबई : गोरेगावमधील ऑइल रिफायनरी कंपनीची ४६ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशात सत्तेवर असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार कन्नमुरू रघु रामा कृष्णा राजू कनुमुरू यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू यांच्या मे. इंड भारत थर्मल पॉवर लि. व मे. इंड भारत पावर जेनकॉम लि. या दोन्ही कंपन्या वीजनिर्मितीचे काम करतात. या दोन कंपन्यांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत एक लाख ९८ हजार ७७५ टन कोळसा तक्रारदार कंपनीकडून घेतला होता. सुरुवातीला काही रक्कम तक्रारदार कंपनीला देण्यात आली. त्यानंतर पैसे न मिळाल्यामुळे कंपनीला ४६ कोटी ६९ लाख रुपयांचे नुकसान झाले.गोरेगाव एस. व्ही. रोड येथील गंधार ऑइल रिफायनरीचे उपाध्यक्ष कुणाल कैलास पारेख यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी खासदार राजू यांच्याशी संपर्क साधला असता हा दोन कंपन्यांमधील वाद आहे व हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये आहे. आपला या प्रकरणात काहीही संबंध नाही. आम्ही याप्रकरणी गुन्हा रद्द करण्याच्या दृष्टीने कायदेशीर प्रक्रिया करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
The post आंध्र प्रदेशातील खासदारासह ७ जणांवर गुन्हा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/vYpZxTByX
via IFTTT